
अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या शिवसेनेचे चंद्रपुरात जबरदस्त कौतुक व्हायला लागले आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक शेतात वीजेचे खांब उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी २०१७ साली एक शासन निर्णय काढण्यात आला होता ज्याद्वारे शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचंही ठरलं होतं, मात्र तो न मिळाल्याने शेतकरी संतापले होते. या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण करत आंदोलन केलं होतं.
टॉवरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांचा एल्गार
आमदार धानोरकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली होती. तहसीलदारांनी धानोरकर यांची भेट घेून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आंदोलकांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण करत असल्याचं लेखी निवेदन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. या इशाऱ्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांनी यांनी आमदार धानोरकर यांचं जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्याशी मोबाईलद्वारे बोलणं करून दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्यात येत आहे असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
या आंदोलनामध्ये रमेशभाऊ देशमुख सह संपर्क प्रमुख ,अनिल धानोरकर जिल्हा प्रमुख ,सतीश भिवगडे जिल्हा प्रमुख ,रमेश तिवारी माझी सह सपर्क प्रमुख ,सुरेश पचारे शहर प्रमुख, मनोज पाल शिवसेना नेते, सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख ,भारती दुधानी जिल्हा संघटिका जयदीप रोडे कामगार सेना जिल्हा प्रमुख ,सोहेल शेख वाहतूक सेना जिल्हा प्रमुख विलास डांगे तालुका प्रमुख चिमूर यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते आणि टॉवर बाधित शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

























































