चंद्रपूर – सहा नगरपंचायतीच्या 20 जागांसाठी मतदान सुरू, 68 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये होणार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या 20 जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. एकूण 68 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.  जिल्ह्यातील सिंदेवाही, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती, सावली या सहा नगर पंचायतीत ही निवडणूक होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात इथली प्रक्रिया थांबवली होती. ओबीसींसाठी राखीव असलेल्या या जागा आता सर्वसाधारण गटातून भरत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. बुधवारी सर्वच जागांची मतमोजणी त्या-त्या नगरपंचायतीच्या मुख्यालयात होणार आहे.