सापाने खाल्ला कापूस, पुढे काय झालं पहा व्हिडीओ…

1936

नाग अथवा साप यांचे खाद्य आहे ते हे उंदीर अथवा घुशी. यांच्या व्यतिरिक्त सापाने अन्य काही खाल्ले तर..! चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या साखरवाही येथे घडलेल्या एका घटनेने सर्पमित्रांच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या गावातील सुनील रासेकर यांच्या घरी नाग आढळून आल्यावर त्यांनी सर्पमित्रांना पाचारण केले. सर्पमित्रांनी नाग पकडला. मात्र त्यांना त्याच्या पोटात काहीतरी असल्याची शंका आली. नागाला समतल जागेवर सोडल्यावर या नागाने चक्क पोटातून कापसाचे बोळे बाहेर काढले. कापसाच्या गंजीत सहसा दडुन बसणारे उंदीर अथवा पक्ष्यांची अंडी यांचा मागमूस काढत नाग तिथे पोचला आणि त्याने आपल्या भक्ष्यासह कापूसही पोटात गिळला अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या हा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र व्हिडिओमुळे नाग कापूस खातो का? असाही सवाल विचारला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या