चंद्रपूर : गुरे चारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरे चारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मृतक जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चिंचोली गावातील असून मृतकाचे नाव नामदेव ठाकरे (40) असे आहे. घटनेची माहिती मिळताच वनधिकारी घटनास्थळी पोहचले. या घटनेमध्ये परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी वनधिकाऱ्यांकडे केली.