पूल चढताना मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाले; वेगाने मागे आला अन्… थरारक अपघात CCTV मध्ये कैद

चंद्रपूर शहरामध्ये एक थरारक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शहरातील जुना वरोरा नाका रेल्वे ओव्हेर ब्रिजचा चुकीचा उतार या अपघाताचे कारण ठरला आहे. हा पूल चढताना एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि हा ट्रक वेगाने मागे आला. वेगाने मागे येत ट्रकने चार गाड्यांना धडक दिली. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणताही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुना वरोरा नाका रेल्वे ओव्हर ब्रिजवरून शनिवारी सकाळी वर्दळीच्या वेळी एक मालवाहू ट्रक जात होता. अचानक या ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि हा ट्रक वेगाने मागे येऊ लागला. ट्रकने 4 गाड्यांना धडक दिली. त्यानंतर हा ट्रक साधारण 500 मीटर ब्रेक फेल अवस्थेत जात थांबला.