चंद्रपूर- वरोरा शहरात प्रेमी युगुलाची आत्महत्या

file photo

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात प्रेमी युगुलाने  आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. या दांपत्याने रेल्वेखाली झोकून देत आयुष्य संपविले.

आकाश मेश्राम (22, रा. समुद्रपूर जिल्हा वर्धा) तर मयुरी कांबळे (17, रा. भद्रावती) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी वरोरा शहरातील महाकाली नगरी परिसराच्या मागे असलेल्या ट्रॅकवर आत्महत्या केल्याची माहिती रेल्वेने वरोरा पोलीसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोचत दोन्ही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. वरोरा पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या