महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

157

मागील पाच वर्षांत वीजनिर्मिती मुबलक झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. त्यामुळे सर्व भागात अखंडित वीजपुरवठा शक्य झाल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले. शेतकऱयांना दररोज आठ ते दहा तास वीजपुरवठा शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात महानिर्मितीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना 20 मे 2019 रोजी घडली. विविध वीज केंद्रांतून रेकॉर्डब्रेक असे 10 हजार 34 मेगावॅट वीज उत्पादन झाले. त्यात औष्णिक विद्युत केंद्राचे वीज उत्पादन 7 हजार 577 मेगावॅट, नाशिक 561 मेगावॅट, कोराडी दीड हजार मेगावॅट, खापरखेडा 951 मेगावॅट, पारस 450 मेगावॅट, चंद्रपूर 2 हजार 550 मेगावॅट, भुसावळ 967 मेगावॅट, उरण वायू विद्युत केंद्रात 270 मेगावॅट, सौरऊर्जा 119 मेगावॅट व जलविद्युत केंद्रातून 2 हजार 100 मेगावॅट वीजनिर्मितीचा समावेश आहे. अखंडित वीजपुरवठय़ामुळे कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने दररोज आठ ते दहा तास वीजपुरवठा शक्य झाला आहे. तसेच सौर कृषिपंप देऊन शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहाय्य केले जात असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या