‘विक्रम’चा ठावठिकाणा सापडेना!

490
**EDS: BEST QUALITY AVAILABLE** New Delhi: NASA image released on Friday, Sept. 27, 2019, shows the targeted landing site of India’s Chandrayaan-2 lander, Vikram. The high-resolution images captured by Lunar Reconnaissance Orbiter Camera (LROC) shows the Moon's unchartered south pole where the Chandrayaan 2 lander attempted to soft-land during the ambitious mission three weeks ago. (NASA Twitter/PTI Photo)(PTI9_27_2019_000023B)

चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडर जिथे उतरणार होता त्या ठिकाणाची छायाचित्रे नासाने प्रसिद्ध केली आहेत. नासाच्या लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटरने 21 सप्टेंबरला ही छायाचित्रे टिपली.

चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ दोन किलोमीटर दूर असताना सॉफ्ट लँडिंगऐवजी हार्ड लँडिंग झाल्यामुळे विक्रमशी संपर्क तुटला आणि ही मोहीम अंशतः अयशस्वी झाली. ‘विक्रमची चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाली आहे. मात्र, विक्रम नेमका कुठे आदळला ते ठिकाण शोधता आलेले नाही. आम्ही ही छायाचित्रे 150 किलोमीटर अंतरावरून घेतली आहेत,’ असे नासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. विक्रम चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावरील ‘एन’ आणि ‘सी’ विवरांच्या मध्ये उतरणार होता. मात्र, त्याचा संपर्क तुटल्यामुळे तो नेमका कुठे उतरला याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान, 14 ऑक्टोबरला चंद्राच्या या भागावर प्रकाश असल्यामुळे नासाचा आर्बिटर पुन्हा विक्रमच्या नियोजित लँडिंग साईटची छायाचित्रे घेणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या