Chandrayaan-2 – इस्त्रोचे आणखी एक ट्वीट, ऑर्बिटरबाबत दिली महत्त्वाची माहिती

9412
k-sivan

विक्रम लँडरशी संपर्क साधण्यास अवघा दोन दिवसांचा अवधी बाकी असतानाच हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने एक ट्वीट करून ऑर्बिटरबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘चंद्राभोवती भ्रमण करत असणाऱ्या ऑर्बिटरच्या पेलोडवर करण्यात आलेले प्राथमकि प्रयोग यशस्वी झाले आहेत. सर्व पेलोडसची कामगिरी समाधानकारक आहे’, असे इस्रोने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Chandrayaan-2 नासाच्या कॅमेऱ्यात ‘विक्रम’ लँडिंग साईटचे फोटो कैद, खूशखबर मिळणार?

मंगळवारी सायंकाळी इस्त्रोने चांद्रयाय-2 मोहीमेबाबत एक ट्वीट केले होते. चांद्रयान-२ मोहिमेत पाठिशी उभे राहिल्याबद्दल इस्त्रोने देशवासियांचे आभार मानले होते. आता गुरुवारीही इस्त्रोने ट्वीट करून चांद्रयान-2 मोहीमेबाबत माहिती दिली आहे. चांद्रयान-2 चा ऑर्बिटर ठरल्याप्रमाणे सर्व वैज्ञानिक चाचण्या करत आहे. ऑर्बिटरमध्ये आठ अत्याधुनिक पेलोड आहेत. ज्यावरुन चंद्राचा नकाशा तयार करण्यात येईल तसेच चंद्रावर पाणी, बर्फ, खनिजांचा शोध घेतला जाईल. विक्रम लँडरबरोबर संपर्क का तुटला? ते शोधून काढण्यासाठी इस्रोच्या तज्ञांची समिती त्यावर काम करत असल्याची माहिती ट्वीटमधून देण्यात आली आहे.

vikram

नासाच्या ऑर्बिटरने टिपले फोटो
चंद्राला गेल्या 10 वर्षापासून प्रदक्षिणा घालणारे नासाचे लूनर रिकॉनिस्सेंस ऑर्बिटर (LRO) विक्रम लँडिंग साईटवरून गेले. नासाच्या ऑर्बिटरने विक्रम लँडिंग साईटचे फोटो काढले आहेत. यासंदर्भात नासाच्या ग्रह विज्ञान विभागाचे एक अधिकारी जोशुआ ए हैंडाल यांनी एक ई-मेल प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘लूनर रिकॉनिस्सेंस ऑर्बिटरच्या कॅमेराने (LRO) विक्रम लँडिंग साईटच्या भागातील फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याचे सांगितले. या फोटोंची समिक्षा करण्यात येणार असून त्यानंतर ते प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे विक्रमच्या संपर्काच्या आशा कायम आहेत.

इस्त्रोची माहिती
चांद्रयान-2 मोहीमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्वास काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख सिवन यांनी व्यक्त केला होता. ऑर्बिटरचे वाढलेले आयुष्य चांद्रयान-2 मोहिमेच्या पथ्यावर पडणारे असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्ष कार्यरत रहाणार आहे. पाण्यासंदर्भात महत्वपूर्ण शोध ऑर्बिटरच्या माध्यमातून लागू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या