चांद्रयान-3चे प्रक्षेपण 14 जुलैला 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था 14 जुलै रोजी दुपारी अडीच वाजता चांद्रयान-3चे प्रक्षेपण करणार आहे. चांद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरण्यास यशस्वी झाले तर हिंदुस्थान अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश ठरेल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे.