‘चांद्रयान-3’ साठी पुढील 24 तास महत्त्वाचे

‘चांद्रयान-3’ सोबत पाठवलेले विक्रम लँडर व्यवस्थित आहे. चिंता करण्याची गरज नाही. हे योग्य पद्धतीने चंद्राच्या दिशेने जात आहे, अशी माहिती हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने दिली. चांद्रयान-3 चे काऊंटडाऊन सुरू झाले असून पुढील 24 तास खूपच महत्त्वाचे आहे. ‘इस्रो’ने ट्विट करून चांद्रयान-3 चे नवीन अपडेट दिले आहेत. चांद्रयान-3 च्या लँडर मॉडय़ूलला चंद्राच्या जवळ आणण्यासाठी डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर याची स्थिती सामान्य आहे, असे ‘इस्रो’कडून सांगण्यात आले.