ओळखपत्राशिवाय बदला दोन हजारांची नोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही ओळखपत्राशिवाय 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. मात्र, हा रिझर्व्ह बॅंकेचा कार्यकारी धोरण निर्णय आहे, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे ज्यांच्याकडे अजूनही मोठय़ा प्रमाणात 2 हजारांच्या नोटा आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे.