
यस बँकेने 1 ऑक्टोबर 2025 पासून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू करण्याचे ठरवले आहे. या नव्या नियमामुळे पगार, डिफेन्स आणि व्यापारी अकाऊंटवर थेट परिणाम होईल. सॅलरी अकाऊटला आता 199 रुपयांचे फीवाले रुपे डेबिट कार्ड मिळेल. 10 हजार खात्यात ठेवले तर ही फी माफ होईल. तसेच दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून 3 वेळा पैसे काढण्याची सुविधा आहे. यापेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर प्रत्येक फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवर 23 रुपये आणि नॉन फायनान्शियलवर 10 रुपये चार्ज लावला जाईल.