
महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की करून विनयभंग केल्याप्रकरणी भाजपचे तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांच्यासह शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांविरुद्ध 18 तारखेला तुमसर येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना शनिवारी सकाळी अटक केली. दोघांचीही 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी आमदार चरण वाघमारे व अनिल जिभकाटे यांना दुपारी तुमसर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वाघमारे व जिभकाटे यांना 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दोघांनाही भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.


























































