
सामना ऑनलाईन, मुंबई
उन्हाळ्याच्या सुट्टीत रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाडय़ांमध्ये जास्त सामान घेऊन तुम्ही प्रवास करताय… मग इकडे लक्ष द्या. कारण रेल्वेने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन गेल्यास तुम्हाला अतिरिक्त दर द्यावा लागणार आहे. किती सामान तुम्ही मोफत घेऊ जाऊ शकता हे ट्रेनच्या डब्यांच्या श्रेणीवर अवलंबून असेल. अतिरिक्त सामानासाठी रेल्वेच्या संकेतस्थळावर दरपत्रक जाहीर केले आहे. अतिरिक्त सामानावर आता दीडपट अधिक शुल्क भरावे लागणार आहे.
- एसी फर्स्ट क्लासमध्ये 70 किलोपर्यंत वजनाच्या सामानावर कोणतेही शुल्क नाही.
- जास्तीत जास्त 150 किलो सामान नेऊ शकता.
- एसी 2 टायर (फर्स्ट क्लास)मध्ये 50 किलो, एसी 3 टायर स्लीपरमध्ये 40 किलो, स्लीपर क्लासमध्ये 40 किलो आणि सेकंड क्लासमध्ये 35 किलोपर्यंत मोफत सामान नेता येईल. त्यानंतरच्या सामानासाठी अतिरिक्त शुल्क आकारले
जाईल. - बॅगची साइज किती असावी याबाबतही नियम ठरवून दिले आहेत.
- 5 ते 12 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांबरोबर असलेल्या पालकांना 50 किलोपर्यंतचे सामान घेऊन जाण्याची मुभा आहे.
- किती सामान तुम्ही प्रवासात नेऊ शकता हे डब्याच्या श्रेणीवर अवलंबून असेल.





























































