माजी अध्यक्षावर आरोपपत्र

 

ब्राझीलचे माजी अध्यक्ष जाइर बोलसनारो यांच्यावर स्वतःच्या कोविड-19 लसीकरणसंबधित आकडेवारीत फसवणूक केल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. ब्राझीलच्या फेडरल पोलिसांनी बोलसनारो यांच्यावर पहिल्यांदाच आरोप ठेवले आहेत. बोलसनारो हे 2019 ते 2022 दरम्यान जगात कोरोनाची महासाथ असताना ब्राझीलचे अध्यक्ष होते. ते आणि अन्य 16 जणांनी सार्वजनिक आरोग्य डेटाबेसमध्ये खोटी माहिती भरली होती. ब्राझीलच्या सुप्रीम कोर्टाने मंगळवारी हे आरोपपत्र प्रसिद्ध केले.