पॉवर सप्लायशिवायही दुसऱ्या खोलीतला फोन, लॅपटॉप होणार चार्ज!

स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. स्मार्टफोन झटपट चार्जिंग व्हावा यासाठी सध्या नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहेत. हल्ली काही स्मार्टफोन तर अवघ्या 15 ते 20 मिनिटात 80 टक्के चार्ज होतात. अगदी वायरलेस चार्जिंग डिव्हाईसदेखील बाजारात आले आहेत. आता एक पाऊल आणखी पुढे टाकत संशोधकांनी आता अँटी लेझर डिवाइसवर तयार केला आहे.

या विशेष तंत्रज्ञानाच्या इनविजीबल बिम एनर्जीच्या माध्यमातून दुसऱया खोलीत ठेवलेल्या फोन किंवा लॅपटॉपला चार्जरशिवाय किंवा पावर सप्लाय शिवाय चार्जिंग करता येणार आहे. अगदी वायरलेस चार्जिंग पॅडवर ठेवण्याचीदेखील गरज भासणार नाही. लेझर डिव्हाइसमध्ये पह्टॉन्स एका रांगेत पुढे जातात. अँटी लेझर डिव्हाईसमध्ये मात्र रिव्हर्स ऑर्डरमध्ये एकापाठोपाठ दुसऱया पह्टॉन्सला आकर्षित केले जाते. याद्वारे पाठवलेला विद्युतप्रवाह दूरवर ठेवलेला डिव्हाईस आकर्षित करतो. या पद्धतीला कोहेरेंट परफेक्शन अॅब्जोर्बेशन असे नाव दिले आहे. मशीनच्या मदतीने युजर्स पावर सेंड आणि रिसिव्ह करू शकतात. वायरलेस चार्जिंगपेक्षा हा पर्याय खूप प्रगत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या