चॅटजीपीटी सर्व्हर डाऊन, युजर्सचा तक्रारींचा पाऊस

जगभरात लोकप्रिय असलेली एआय चॅटजीपीटी सेवा अचानक बंद पडली. चॅटजीपीटीचा सर्व्हर डाऊन झाल्याने जवळपास 20 मिनिटे ही सेवा बंद पडली होती. या काळात शेकडो युजर्संनी सोशल मीडियावर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला. चॅटजीपीटीची सेवा 20 मिनिटे बंद पडली होती. एकट्या हिंदुस्थानात 439 युजर्संनी चॅटजीपीटी वापरताना अडचण येत असल्याचे म्हटले.