यूएईत मोफत मिळणार चॅटजीपीटी सब्सक्रिप्शन

ओपनएआयचे प्रसिद्ध आर्टिफिशियल इंटेलिजेन्स टूल चॅटजीपीटीची जगभरात व्रेझ वाढत आहे. हिंदुस्थानसह अनेक देश याचा उपयोग फ्री आणि पेज व्हर्जनमध्ये करतात. परंतु आता संयुक्त अरब अमिरात (यूएई) जगातील पहिला देश बनला आहे, ज्याने संपूर्ण लोकांना चॅटजीपीटी प्लसचे प्रीमियम सब्सक्रिप्शन एकदम फ्रीमध्ये दिले आहे. यूएई सरकार आणि ओपनआय यांच्यात एक करार झाला आहे. या करारांतर्गत अबूधाबीमध्ये एक मोठे एआय डेटा सेंटर तयार केले जात आहे. त्यामुळे आता यूएईमध्ये राहणाऱया प्रत्येक नागरिकाला चॅटजीपीटी प्लसचे फ्री अॅक्सेस मिळणार आहे.