
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत कंपनीमध्ये झोपलेल्या 6 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले. जवळपास 3 तासाच्या शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र, तो पर्यंत 6 कामगारांसह एका कुत्र्याचा होरपळून मृत्यू झाला.
वाळूज औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर सी 216 शाईन इंटरप्रायजेस कंपनी आहे. या कंपनीमध्ये हॅण्डग्लोजसह इतर साहित्य बनविण्यात येते. या कंपनीमध्ये जवळपास 10 ते 15 कामगार काम करतात. या कामगारांसाठी राहण्याची सोय कंपनीमध्ये करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे कंपनीत काम आटोपल्यानंतर सर्व कामगार आपआपल्या नियोजित ठिकाणी झोपले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कंपनीतून धुर निघत असल्याचे कंपनीत झोपलेल्या एका महिलेच्या लक्षात आले. या महिलेने आपल्या सोबतच्या लहान मुलांना उठवून आरडओरड करून कंपनीच्या गेट बाहेर पळ काढला. हा घोंगाटा ऐकून कंपनीतील 4 कामगारांना जाग आली. तो पर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. या चारही कामगारांनी भिंतीचा आश्रय घेऊन एका झाडाच्या मदतीने दुसर्या बाजूने उडी मारत पळ काढला. त्यामुळे हे चौघेही बालबाल बचावले.
या आगीची माहिती मिळताच औद्योगिक विकास महामंडळ वाळूज अग्निशन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग वाढत असल्याचे लक्षात येताच शहरातील अग्शिमन बंब बोलवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुमारे 3 तास शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र, तोपर्यंत कंपनीत आडकलेले मोहम्मद मुस्तका मोहम्मद इब्राहिम (62,रा. मिर्झापुर, लदनिया मधुबन बिहार), कोशर आलम जफीरउद्दीन (37,रा.डलोखर दर्जीटोल,मिर्झापुर), मोहम्मद एकबाल मोहम्मद एहरार (17,मिर्झापुर), मोहम्मद मार्गव आलम साहबुद्दीन (32 मिर्जापुर) यांच्यासह आणखी 2 अनोळखी कामगारांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.
कंपनीच्या प्रवेशद्वाराकडून आग पुढे सरकत असल्याने कंपनीतून कामगारांना बाहेर पडले शक्य नव्हते. पाठीमागील बाजूला भिंत व वरच्या बाजूने पत्रे असल्याने त्यांना थेथूनही बाहेर पडणे कठीण होते. मात्र, जीव वाचविण्यासाठी कंपनीच्या आवारातील एका झाडाचा आश्रय घेऊन 4 कामगार बाहेर पडले त्यांचेच प्राण वाचले मात्र, 6 कामगारांना बाहेर पडणे शक्य झाले नाही त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
झोळी करून कामगार काढले बाहेर
आपला जीव वाचवून बाहेर पडलेल्या कामगारांनी सोबतच्या कामगारांना झोपेतून उठविण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, एकानेही फोन घेतला नाही. त्यामुळे एकच आरडाओरड सुरू केली. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. शेवटी संपुर्ण आग विझविल्यानंतर झोळीत त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
सहायक पोलीस आयुक्तांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच छावणी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गौतम पातारे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. ही आग पाहटे साडे तीन वाजेच्या सुमारास अटोक्यात येईपर्यंत ठाण मांडला होता.
आगीचे कारण अस्पष्ट
ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल कुठलीच माहिती समजू शकली नाही. मात्र, सदरील आग ही शॉटसर्किटमुळे लागली असावी असा आंदाज प्रथर्मदर्शी वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी पंचनामा नंतर आगिचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. होरपळलेल्या कामगारांना घाटी रुग्णालयात दाखल केले.
पोलीस उपनिरीक्षक प्रविण पातारकरांनी दिला खडा पहारा
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पातारकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी अतिरिक्त बंब तसेच पाण्याचे टँकरसह बंदोबस्ताची मोठी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सर्तक्तेमुळे कंपनी लगत असलेल्या इतर कंपनीत ही आग पसरू नये यासाठी त्यांनी चोख कामगिरी बजाविली.



























































