‘छत्रीवाली’ मालिकेत बॅण्डबाजा बारात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘स्टार प्रवाह’वरील ‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा आणि विक्रमच्या नात्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळतायत. मधुरावर जिवापाड प्रेम करणार्‍या विक्रमने अनेकदा आपल्या प्रेमाची कबुली दिलेय. मधुराला वेगवेगळी सरप्राईजेसही दिली आहेत. एवढंच नाही तर त्याने आपला जीव धोक्यात घालून मधुराला मनवण्याचा प्रयत्न केलाय.

मधुराचं प्रेम जिंकण्यासाठी विक्रम वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यासाठी त्याने आणखी एक शक्कल शोधून काढलीय. मधुराला लग्नाची मागणी घालण्यासाठी विक्रम सज्ज झालाय आणि तेही बॅण्डबाजा घेऊन. नवरदेवाप्रमाणे हातात फुलांची माळ घेऊन तो मधुराला लग्नासाठी विचारणा करणार आहे. छत्रीवाली मालिकेचा हा रंगतदार एपिसोड 17 जानेवारीला प्रेक्षकांना पहाता येईल. मधुराला इम्प्रेस करण्याचा विक्रमचा हा प्रयत्न यशस्वी होणार का? विक्रमच्या प्रेमाचा मधुरा स्वीकार करणार का? याचा उलगडा महासोमवारच्या भागामध्ये होणार आहे.