
छत्तीसगडमध्ये माजी मंत्री आणि भाजप नेते राजिंदरपाल सिंह भाटिया यांनी आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाटिया चौरिया भागात आपल्या लहान भावासोबत राह होते. रविवारी राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
भाटिया हे राजनंदगावच्या खुज्जी विधानसभा मतदारसंघातू तीन वेळा निवडून आले होते. 2003 ते 2008 दरम्यान ते राज्याचे परिवहन मंत्रीही होती. भाटिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ते कोरोनातून बरेही झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. भाटिया यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.




























































