108 किलो बेल्जियम चॉकलेटपासून साकारली गणेश मूर्ती

पंजाबमध्ये एका गणेशभक्त शेफने 108 किलोंचे बेल्जियम चॉकेलटपासून गणेश मूर्ती साकारली आहे. चॉकलेट बाप्पाचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले असून अनेकांनी या अनोख्या इको फ्रेंडली गणपतीची प्रशंसा केली आहे.

लुधियानाचे शेफ हरजिंदर सिंह कुकरेजा यांनी 108 किलोंच्या बेल्जियम चॉकलेटपासून गणेश मुर्ती बनवली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी 20 शेफ्सनी 10 दिवस मेहनत घेतली आहे. या मुर्तीचे विसर्जन दुधात केले जाईल आणि नंतर हे चॉकलेट दूध भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जाईल. हरजिंदर यांनी जेव्हा ट्विटरवर याबाबत फोटो टाकले तेव्हा नेटकर्‍यांनी त्यांची प्रशंसा केली.

आपली प्रतिक्रिया द्या