‘अम्मां’नंतर मोदीच आमचे ‘डॅडी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चेन्नई

‘अम्मा’ जयललिता यांच्या पश्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे ‘डॅडी’ आहेत असे वक्तव्य अण्णा द्रमुकचे नेते आणि मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनी पक्षाच्या एका बैठकीनंतर केले.

जयललिता यांनी राष्ट्रीय पक्षांशी ‘आघाडी’ करण्याचे टाळलेले असताना तुमच्या पक्षाची लोकसभेसाठी भाजपशी युती कशी, असा सवाल त्यांना पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना बालाजी म्हणाले की, अम्मांनंतर मोदी यांनीच आमच्या पक्षाला डॅडीप्रमाणेच मार्गदर्शन केले आहे. इतकेच नव्हे तर मोदी हे फक्त अण्णा द्रमुकचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानचेही ‘डॅडी’ आहेत, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी जयललिता यांनी ‘तामीळनाडूची लेडी’ की ‘गुजरातचे मोदी’ अशी घोषणा दिली होती.