
कोव्हीशिल्ड लस घेतल्यामुळे आरोग्य विषयक गंभीर समस्या उत्पन्न झाल्याने चेन्नईच्या एका 40 वर्षीय स्वयंसेवकाने कोव्हीशिल्ड लसीच्या चाचण्या, उत्पादन आणि वितरण तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. या स्वयंसेवकाला ही लस दिल्यानंतर मज्जासंस्थेचे तसेच मानसशास्त्राrय विकार झाल्याने त्याने पाच कोटीची नुकसानभरपाईदेखील मागितली आहे. सिरम इन्सिटय़ूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्याच्या 24 तासांत ही घडामोड घडल्याने खळबळ उडाली आहे.
चेन्नईच्या श्री रामचंद्र उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेत चाचणीदरम्यान पेशाने बिझनेस कन्सलटन्ट असलेल्या या स्वयंसेवकाला 1 ऑक्टोबर रोजी कोव्हीशील्ड लस देण्यात आली होती. कोव्हीशिल्ड ही लसीची निर्मिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका यांच्या मदतीने पुण्याच्या सीरम इन्सिटय़ूट ऑफ इंडियामध्ये केली जात आहे. दि ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) आणि साईट इन्सिटय़ुशनल एथिक्स कमिटी आता या स्वयंसेवकाला प्रायोगिक तत्वावर हा डोस दिल्यानंतर शारीरिक बदल झाले की हा योगायोग होता याचा अभ्यास करीत आहे. या प्रकरणी इंडियन काwन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या महासंचालकांना आणि सेंट्रल ड्रग्ज स्टँर्डड कंट्रोल ऑर्गनायझेशनला स्वयंसेवकाने 21 नोव्हेंबर रोजी कायदेशीर नोटिसही पाठविली आहे.
सिरमने दावा फेटाळला
सिरमने हा दावा फेटाळून लावला आहे. तर याविरोधात आपण त्यांच्याविरोधात नुकसानभरपाईचा 100 कोटींचा दावा ठोकू शकते, असे सिरमने रविवारी जाहीर केले आहे. नोटीसीमध्ये करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि द्वेषयुक्त असे आहेत. स्वयंसेवकाच्या तब्बेतीबद्दल सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाला नक्कीच सहानुभूती आहे मात्र, लस चाचणीचा स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थितीशी कोणताही संबंध नाही. सदर स्वयंसेवक हा त्याच्या सद्यस्थितीचा दोष चुकीच्या पद्धतीने कोविड लसीच्या चाचणीवर लावत आहे.’ अशा प्रकारची चुकीची माहिती पसरविण्यामागे काही विशिष्ट हेतू असू शकतो, असे मत देखील यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.





















































