चेन्नई एक्सप्रेस 1 जुलैपासून ‘सुपरफास्ट’!

789

मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱया चेन्नई एक्स्प्रेसचा वेग येत्या 1 जुलैपासून वाढणार आहे. मुंबई ते चेन्नई मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचे 90 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील तीन एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात येणार आहे. ट्रेन क्र.11041 /11042 सीएसएमटी ते चेन्नई (दैनिक गाडी), ट्रेन क्र.11027/11028 सीएसएमटी ते चेन्नई एक्स्प्रेस या गाडय़ांचा दर्जा आता ‘सुपरफास्ट’ एक्स्प्रेस करण्यात आला असून त्यासाठी काही थांब्यांना वगळण्यात आले आहे. नंबर बदललेल्या ट्रेन क्र. 22157/58 यामुळे वेगात चार तासांची बचत होणार आहे.

रेल्वे बोर्डाने ट्रेन क्र.11041 /11042 सीएसएमटी ते चेन्नई (दैनिक गाडी), ट्रेन क्र.11027/11028 सीएसएमटी ते चेन्नई एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र.12163/12164 दादर ते चेन्नई (दैनिक गाडी) या गाडय़ांचा वेग वाढविण्यास मंजुरी दिली आहे. तसेच ट्रेन क्र.12163 /12164 आणि ट्रेन क्र. 11027/11028 यांच्या टर्मिनसमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. ट्रेन क्र.12163 एलटीटीहून सुटून चेन्नई इग्मोरला असलेला तिचा शेवटचा थांबा आता चेन्नई सेंट्रलला होणार आहे. ही ट्रेन 1 तास 40 मिनिटांनी वाढणार असून 1271 कि.मी.चे अंतर ती 21 तास 35 मि. कापणार आहे. ट्रेन क्र.12164 चाही वेग वाढणार असून ती 1 तास 30 मिनिटांनी वेगवान होणार आहे. ती 1271 कि.मी.चे अंतर चेन्नई सेंट्रल ते एलटीटी 21 तास 45 मिनिटांत कापेल. ट्रेन क्र. 11041 42 ला हिचा क्र.22159 5/60 होणार आहे. या ट्रेनचा प्रवास चेन्नईच्या दिशेने 4 तास 15 मिनिटांनी वेगवान होईल आणि मुंबईच्या दिशेने दोन तासांनी तिचा वेग वाढणार आहे. सर्वात मोठा फायदा 11027/285 मेलवरून 22157/58 सुपरफास्ट होणाऱया गाडीला होणार असून ही गाडी चेन्नईच्या दिशेने 4 तास 55 मि.तर मुंबईच्या दिशेने 4 तास 35 मि. इतक्या वेळाची बचत करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या