चेन्नई : तरुणाने केली प्रेयसीची हत्या, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवले मृतदेहाचे फोटो

चेन्नईतील एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवल्याने एकच खळबळ उडाली होती. आशिक असे त्या तरुणाचे नाव असून चेन्नई पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आशिक व त्याची प्रेयसी हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांसोबत नात्यात होते. गेल्या काही महिन्यांपासून ते एकाच घरात राहायला लागले होते. आशिकची प्रेयसी ही नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थीनी होती. गेले तीन दिवस ती कॉलेजला न आल्याने तिच्या मित्र मैत्रीणींनी तिची चौकशी केली. त्यावेळी त्यांना आशिकच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तिचा मृतदेहाचे फोटो दिसले.

त्यानंतर तिच्या मैत्रीणीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ आशिकला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या प्रेयसीचा खून केल्याचे मान्य केले.