‘छपाक’मुळे दीपिका नव्याने कळली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण आगामी चित्रपट ‘छपाक’च्या निमित्ताने आकर्षणाचे केंद्र बनली आहे. ‘छपाक’ या चित्रपटामध्ये दीपिकाने ‘मालती’ या ऍसिड हल्ला पीडितेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या नीडर भूमिकेने तिने सर्वांचीच मने जिंकली आहेत. अनेकांनी दीपिकाच्या ‘छपाक’मधील भूमिकेचे कौतुक केले असून यामध्ये आपली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील आघाडीकर आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पादुकोण आणि सोनाली कुलकर्णीने दिलखुलास गप्पा मारल्या. सोनालीने दीपिकाला ऍसिड हल्ल्यासारख्या एका संवेदनशील मुद्दय़ाला हात घातल्याबाबत अभिनंदन केले. या भेटीबाबत बोलताना सोनाली म्हणाली की, दीपिका स्वतः खूप सुंदर अभिनेत्री आहे आणि आपल्या आगामी ‘छपाक’ या चित्रपटामध्ये तिने ‘मालती’ या ऍसिड हल्ला झालेल्या दुर्दैकी मुलीची भूमिका साकारण्याचा घेतलेला निर्णय हा खूपच धाडसी आहे. दीपिकाने चित्रपटात साकारलेली मालतीची भूमिका आणि मालतीला वैयक्तिक आयुष्यात आलेल्या विदारक अनुभवातून जाणं, हे खरोखरच किती भयानक असू शकतं, हे ‘छपाक’ या चित्रपटाविषयी दीपिकासोबत बोलताना प्रत्येक क्षणी जाणवली. या चित्रपटाविषयी बोलताना दीपिकाशी नव्याने ओळख झाली.