
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी झालेल्या चकमकीदरम्यान बेपत्ता झालेल्या 14 जवानांचे मृतदेह 20 तासांनंतर आज रविवारी आढळले. चकमकीत तीन जवान शहीद झाल्याची माहिती शनिवारी रात्री मिळाली होती. या चकमकीत एकूण 17 जवान शहीद झाल्याचे वरिष्ठ अधिकाNयांनी सांगितले.
शहीद जवांनापैकी12 जवान डीआरजीचे आणि पाच एसटीएफचे आहेत. नक्षलवाद्यांनी जवानांकडील 12 एके-47 सह 15 शस्त्रे पळविली आहेत. दरम्यान, या चकमकीत पाच ते सहा नक्षलवादी ठार झाले असून, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. सुकमातील कसालपाड परिसरात मोठ्या संख्यने नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर डीआरजी, एसटीएफ आणि कोब्राचे 550 जवान शुक्रवारी दोरनापालवरून रवाना झाले. जवान नक्षलवाद्यांना ‘सरप्राइज एन्काऊंटर’मध्ये अडकवणार होते; पण नक्षलवाद्यांना याची आधीच माहिती होती.
नक्षलवाद्यांनी प्लॅन करून जवानांना जंगलात येऊ दिले. जवान कसालपाडच्या पुढे गेले आणि नक्षलवाद्यांची हालचाल न दिसल्यामुळे माघारी फिरू लागले. सुरक्षा दल कासलपाडच्या बाहेर येताच काही अंतरावर कोराज डोंगरीजवळच्या डोंगरावरून जवानांवर हल्ला केला. अचानक झालेल्या गोळीबारात काही जवान जखमी झाले, तर काही शहीद झाले. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. यादरम्यान, सैनिकांनी जखमी व शहीद जवानांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इतर जवानांना गोळ्या लागल्या


























































