
राज्य मागासवर्ग आयोग बिहारसारखे सर्वेक्षण करणार आहे. इम्पिरिकल डेटा तयार होणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच जातनिहाय जनगणना होईल, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. 25 राज्यांनी 50 टक्क्यांवर आरक्षण दिले आहे. मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी केला.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिल्लीत पेंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. महाराष्ट्रात मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आपली पेंद्रीय मागासवर्ग आयोगाबरोबर बैठक झाल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इंद्रा सहानीसारखे विषय, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी असेल, बिहारसारखे सर्वेक्षण अशा विविध विषयांवर चर्चा झाली. मी कोट करून सांगतो की, बिहारसारखे सर्वेक्षण संपूर्ण देशात सुरू होईल, असे ते म्हणाले. राज्य मागासवर्ग आयोग बिहारसारखे सर्वेक्षण करणार आहे. संपूर्ण देशात ते सुरू होईल. 25 राज्यांनी 50 टक्क्यांच्या वर आरक्षण दिले. मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी केला.
कर्नाटक, तेलंगणात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण
कर्नाटक आणि तेलंगणाने पेंद्रीय मागासवर्ग आयोगाला विनंती केली आहे की, मराठा समाजाला मागास म्हणून पेंद्राच्या यादीत घ्या. हे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचे प्रश्न सोडवण्याची राज्य मागासवर्ग आयोगाची जबाबदारी नाही का? राज्य सरकारची जबाबदारी नाही का? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

























































