मिंध्यांच्या उमेदवारांचा मतदान केंद्रावर धुडगूस; वेळ संपल्यानंतर अग्रसेन शाळेत घुसखोरी, ‘सामना’च्या छायाचित्रकाराचा कॅमेरा फोडला, धक्काबुक्की करून धमकावले

छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग २९ मधील अग्रसेन विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर मिंध्यांच्या उमेदवारांनी लोकशाहीला लाज आणणारा धुडगूस घातला. मतदानाची वेळ संपल्यानंतर केंद्राच्या आवारात हा तमाशा चालू होता. मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत ‘सामना’चे छायाचित्रकार हुसेन जमादार यांचा कॅमेरा हिसकावून त्याचे तुकडे केले. एवढेच नाही, तर त्यांना धक्काबुक्की करून धमकावले.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले. सर्वत्र मतदान उमेदवारांनी गोंधळ घातला. शांततेत पार पडत असताना प्रभाग २९ मध्ये मात्र मिंध्यांच्या प्रभागातील इटखेडा भागातील अग्रसेन विद्यामंदिरात सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी झाली होती. सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर मिंधे गटाच्या उमेदवार श्वेता सुमीत त्रिवेदी यांचे मतदान प्रतिनिधी मोहित त्रिवेदी हे गेट उघडून केंद्रात घुसले.

मोहित त्रिवेदी हे मतदान केंद्रात घुसलेले पाहताच विरोधी उमेदवारांनी एकच गलका केला. वेळ संपल्यानंतर मतदान प्रतिनिधींचे केंद्रात काय काम आहे? असा सवाल करत जमावाने मोहित त्रिवेदींना बाहेर काढण्याची मागणी केली. हा गोंधळ वाढत असतानाच त्रिवेदी यांचे बाऊन्सर्स कंपाऊंडवरून उड्या मारून आत शिरले. त्यांनी त्रिवेदींना कडे केले. शाळेच्या कंपाऊंडमध्ये आणि बाहेर असा मोठा जमाव गोळा झाला.

छत्रपती संभाजीनगर – बदनापूरहून आणले तीन हजार मतदार; भाजपचा बोगस मतदानाचा डाव शिवसैनिकांनी उधळला

अग्रसेन विद्यामंदिर मतदान केंद्रावर गोंधळ सुरू असल्याचे कळाल्यानंतर मिंथे गटाचे दुसरे उमेदवार सिद्धांत शिरसाट हे आपल्या लवाजम्यासह तेथे पोहोचले. त्यापाठोपाठ उमेदवार श्वेता त्रिवेदी यांचे पती सुमीत त्रिवेदी हेदेखील कार्यकर्त्यांसह आले. त्यानंतर परिस्थिती अजून चिघळली. पोलिसांनी मोहित त्रिवेदी, सुमीत त्रिवेदी आणि सिद्धांत शिरसाट यांना बाहेर जाण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांच्या गराड्यात हे दोघे बाहेर पडत असताना पुन्हा गोंधळ झाला. यावेळी त्रिवेदी यांचा कार्यकर्ता राजू चव्हाण याने ‘सामना’चे छायाचित्रकार हुसेन जमादार यांचा कॅमेरा हिसकावला आणि त्याचे तुकडे तुकडे केले आणि येथून निघून जा, असे धमकावले. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर मनपासाठी 60 टक्के मतदान; ईव्हीएम बंद पडले, बोगस मतदार पकडले