
राज्यपालांपासून भाजपचे प्रवक्ते, मंत्री आणि आमदारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. याबाबत समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण असताना, भाजपचे वरिष्ठ नेते मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ‘छत्रपती शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना सुबुद्धी दे!’ असे म्हणत कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीमातेचा जागर करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली.





























































