छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी उडाली चकमक; 26 नक्षलवादी ठार

प्रातिनिधिक फोटो

 

छत्तीसगडमध्ये गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलांच्या जवानांना नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाली. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांशी उडालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे. एनडीटीव्हीने संबंधित वृत्त दिले असून अधिकृत माहिती लवकरच समोर येईल असे सांगण्यात येत आहे.

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक दलाच्या जवानांनी कारवाई केली, ज्यामुळे अबुझमद परिसरात नक्षलवाद्यांशी चकमक उडाली.