
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाईला मोठे यश मिळाले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांची अथक कारवाईनंतर 103 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 80 पुरुष आणि 23 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 49 नक्षलवाद्यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर 1 कोटी 6 लाख 30 हजार रुपयांचे बक्षीस आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये दंडकारण्य स्पेशल जनता सरकारचे अध्यक्ष, पीपल्स काँग्रेसचे सदस्य, एसीएम, डीव्हीसीएम, जनता सरकारचे सदस्य, मिलिशिया प्लाटून सदस्य आणि सीएनएम, केएएमएस आणि डीएकेएमएस सारख्या आघाडीच्या संघटनांचे सदस्य यांचा समावेश आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांना सरकारी धोरणानुसार प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचे पुनर्वसन रक्कम देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक वरिष्ठ पदाधिकारी होते, ज्यांच्यावर मोठे इनाम जाहीर करण्यात आले होते.