छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार, शस्त्रास्त्र जप्त

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. रविवारी सकाळी ही चकमक झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण अलसेला यांनी सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक आणि सीमा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहीमेत असताना कोयलीबेडा भागातील जंगलात ही चकमक झाली. या अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि दोन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत आणि कारवाई अजूनही सुरू आहे.