
कोंबडी खाल्ल्याने कोरोनाची लागण होत असल्याचा प्रारंभीचा अपप्रचार, त्यानंतर मार्गर्शिर्ष महिन्यातील उपवास आले. आता बर्ड फ्लूच्या धास्तीमुळे राज्यातील बॉयलर कोंबडय़ांच्या विक्रीत पन्नास टक्क्यांनी तर अंडय़ांच्या विक्रीत वीस टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र राज्यातील एकाही पोल्ट्री फार्ममधील कोंबडीला बर्ड फ्लूची लागण झालेली नाहीत. त्यामुळे बॉयलर कोंबडय़ा खाण्यास काहीही हरकत नाही असा दावा नॅशनल एग कोऑर्डीनेशन कमिटीने केला आहे.
महाराष्ट्रात वीस हजारांच्या आसपास पोल्ट्री फार्म आहेत. शेतीला पुरक जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. पोट्री व्यवसायाकर प्रत्यक्ष वप्रत्यक्षणपणे लाखो लोकं अवलंबून आहेत. सध्याच्या बर्ड फ्लूच्या भीतामुळे चिकनप्रेमींमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मात्र राज्यातील पोल्ट्री फार्म चालकांची संघटना असलेल्या नॅशनल एग कोऑर्डीनेशन कमिटीने चिकनप्रेमींना दिलासा दिला आहे. या संघटनेचे मुंबई अध्यक्ष मोरेश्वर देसाई म्हणाले की, परभणीच्या घटनेमुळे घबराट निर्माण झाली, पण परभणीत प्रथम गावठी कोंबडय़ा व कावळ्यामध्ये बर्ड फ्लूचे जिवाणू सापडले. पण कोणत्याही ब्रॉयलर फार्मवरील ब्रॉयलर कोंबडय़ांना लागण झालेली नाही. किंवा अंडी देणाऱ्या कोंबडय़ांना लागण झालेली नाही. ही महत्वाची गोष्ट आहे.
कोंबडय़ांची विक्री निम्म्यावर
मुंबई व परिसरात दररोज सरासरी पाच ते सहा लाख ब्रॉयलर कोंबडय़ांची किक्री होते. पण बर्ड फ्लूच्या भीतीमुळे सध्या दररोज दोन ते तीन लाख कोंबडय़ांचीची विक्री होते.
अंडी किक्री वीस टक्क्यांनी घसरली
मुंबईपासून ठाणे कल्याणपर्यत दररोज सरासरी सव्वा कोटी अंडय़ाची विक्री होते. पण आता अंडय़ांची विक्री वीस टक्क्यांनी घटली आहे.
राज्यातील कोंबडय़ा सुरक्षित
आपल्याकडे ब्रॉयलर कोंबडय़ा महाराष्ट्रातीलच आहे. बाहेरच्या राज्यातून ब्रॉयलर कोंबडय़ा येत नाहीत. महाराष्ट्रातील उत्पादन पुरेसे आहे. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून ब्रॉयलर कोंबडय़ा आणण्याची वेळ येत नाही. महाराष्ट्रातील ब्रॉयलर कोंबडय़ा खाण्याच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. अंडयांच्या कोंबडय़ांचे उत्पादन कमी आहे. म्हणून अंडी तेलंगणा राज्यातून येतात. अन्य राज्यातून अंडी येत नाही. तेलंगणामधील एकाही पक्ष्याला लागण झालेली नाही. तेलंगणामधील पोल्ट्री फार्म, गावठी कोंबडय़ा, कावळे किंवा बदकांमध्येही लागण झालेली नाही. त्यामुळे तेलंगणामधून येणाऱ्या ब्रॉयलर कोंबडय़ा व अंडी सुरक्षित आहेत. त्यांच्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही.
राज्यातील कोणत्याही पोल्ट्री फार्ममध्ये कोंबडय़ांना बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. आपण अन्न जेक्हा शिजवतो तेव्हा त्यात कोणताही विषाणू किंवा जीवाणू जीवंत राहू शकत नाही. कोंबडी किंवा अंडी पूर्णपणे शिजवून खाल्ली तर काहीही अपाय होणार नाही हे जागतिक आरोग्य संघटनेनेही अधोरेखित केले आहे.
– मोरेश्वर देसाई, नॅशनल एग को आर्डीनेशन कमिटी, मुंबई अध्यक्ष



























































