
बाळाच्या आगमनाच्या ओढीने नाना प्रकारच्या वेदना सहन केलेल्या आईला स्वत:च्या चुकीमुळे अवघ्या तीन महिन्यांचे बाळ गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना सोमवारी आग्रा येथे घडली. आईने झेपेत कूस बदलल्याने तिच्या अंगाखाली बाळ दबले गेले. त्यात त्या बाळाचा गुदमरून मृत्यू झाला. आग्रा येथील मालौनी गावामध्ये घडलेल्या या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. झोपेतून जागे झालेल्या आईला आपले बाळ हालचाल करत नसल्याचे दिसले. त्यानंतर तातडीने बाळाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तत्पूर्वीच बाळाचा मृत्यू झाला होता.

























































