चीनमध्ये कोरोनाचे 42 नवे रुग्ण; सर्दी, खोकला ताप अशी लक्षणे नाहीत

1352

चीनमध्ये सुमारे तीन महिन्यांनी वुहान प्रांतातील लॉकडाऊन हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जनजीवन सुरळित सुरू होत असताना चीनमध्ये कोरोनाचे 42 नवे रुग्ण आढळल्याने या रोगाचा पुन्हा उद्रेक होऊ नये, यासाठी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींचीही पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या रुग्णांमध्ये कोरोनाची सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, श्वास घेण्यास त्रास अशी कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.

चीनमध्ये कोरोनाचे 42 नवे रुग्ण आढळल्यानंतर संक्रमितांची संख्या 81,907वर पोहोचली आहे. या 42 जणांमध्ये 38 जण परदेशातून आलेले आहेत. कोरोनाच्या नव्य़ा रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला, घसादुखी अशी कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये, यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची पुन्हा तपासणी करण्याचे आणि इतर आजारांची तक्रार असलेल्यांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नसल्याने नवे रुग्णांची ओळख पटवणे कठीण होणार आहे.

आतापर्यंत 1,097 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. मात्र, तपासणीमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णांपैकी 349 परदेशातून आलेले होते. त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. नव्या रुग्णांमध्ये कोरोनाची लऑक्षणे दिसत नसल्याने ही चितेंची बाब ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या