चीनच्या विजय दिन परेडमध्ये अमेरिकेविरोधात शक्तीप्रदर्शन; 26 देशांच्या नेत्यांची एकजूट

चीनने बुधवारी बीजिंगमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी परेड आयोजित केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या 80 वर्षांनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या परेडद्वारे चीनच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन म्हणून याकडे पाहिले जात आहे. तसेच अमेरिकेविरोधात जागतिक नेते एकवटले असून यातून शक्तीप्रदर्शन घडवले आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या 80 व्या वर्षानिमित्त चीनने बीजिंगमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी परेड आयोजित केली होती. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांच्यासह 26 परदेशी नेत्यांचे स्वागत केले. परेडमध्ये पीएलएने ड्रोन, हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने यांसारख्या शस्त्रांची शक्ती दाखवत सामर्थ्याचे प्रदर्शन केले. दाखवली. हा अमेरिकेला थेट संदेश मानला जात आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने या परेडमध्ये आपल्या आधुनिक लष्करी क्षमतेचे प्रदर्शन केले. त्यात ड्रोन, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने यासारखी शस्त्रे समाविष्ट होती. अनेक पीएलए विमानांचाही यात सहभाग होता. 45 लष्करी तुकड्या तियानमेन स्क्वेअरवर उतरल्या आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना सलामी दिली.

बीजिंगमध्ये पुतिन, किम आणि शी यांची एकत्र उपस्थिती हा अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट संदेश मानला जात आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी पुतिन आणि किमला आपल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केला आहे. जपानने जागतिक नेत्यांना या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे आवाहन केले होते, ज्याचा चीनने तीव्र राजनैतिक निषेध नोंदवला आहे. यापूर्वी चीनने 10 वर्षांपूर्वी विजय दिन परेडचे आयोजन केले होते. यावेळी 80 व्या वर्धापन दिनानिमित्त याला अधिक भव्य स्वरूप देण्यात आले आहे. परेडमध्ये एकूण 26 परदेशी नेते उपस्थित होते.

यामध्ये रशियाचे पुतिन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, म्यानमारचे लष्करप्रमुख मिन आंग ह्लाईंग, उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव, मंगोलियाचे अध्यक्ष खुरेलसुख उखना आणि बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांचा समावेश होता.युरोपमधून स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको आणि सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुचिक यांनीही सहभाग घेतला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन विशेष ट्रेनने चीनला पोहोचले आणि या परेडमध्ये सहभागी झाले. 66 वर्षांनंतर उत्तर कोरियाच्या नेत्याने चीनच्या लष्करी परेडमध्ये हजेरी लावणे हा एक ऐतिहासिक क्षण होता. किम जोंग उन यांचे आजोबा किम इल सुंग 1959 मध्ये अशा परेडमध्ये सहभागी झाले होते.