हिंदुस्थान युद्धासाठी सज्ज! चीन-पाकिस्तानने एकाच वेळी हल्ला केला तर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान आणि चीनने एकाच वेळी हल्ला केला तर जशास तसे उत्तर देण्यासाठी आता हिंदुस्थान सज्ज झाला आहे. आतापर्यंत सीमेवर सैन्याला 10 दिवस पुरेल इतकाच शस्त्रसाठा जवळ बाळगण्याची परवानगी संरक्षण मंत्रालय देत होते. पण एलएसीवरील चीनची आगळीक आणि एलओसीवरील पाकडय़ांच्या उचापती रोखण्यासाठी आता सीमेवरील सैन्याला 15 दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा जवळ ठेवता येणार आहे. पूर्व लडाखमधील चिनी कांगावा रोखण्यासाठी हिंदुस्थानी सैन्याला मिळालेली नवी सूट लाभदायक ठरणार आहे. शिवाय आता लष्कराला आपत्कालीन परिस्थितीत शस्त्रे अथवा दारूगोळा खरेदी करण्याचे आर्थिक अधिकार देण्यात आले आहेत. सीमेवर सैन्याला मजबुती देण्यासाठी विदेशातूनही 50 कोटी रुपयांची हायटेक शस्त्रs खरेदी करण्याचा विचार हिंदुस्थान गंभीरपणे करीत आहे.

हिंदुस्थानी लष्कराने एकाच वेळेस पाकिस्तान आणि चीन यांच्या पुरापतींना दमदार प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या आगळिकीला उत्तर देताना हिंदुस्थानी जवानांना शस्त्रs अथवा दारूगोळ्याची कमतरता भासू नये यासाठी सैन्याला 15 दिवस शत्रूशी मुकाबला करता येऊ शकेल इतका दारूगोळा आणि शस्त्रs बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय आणीबाणीच्या काळात शत्रूला नामोहरम करण्यासाठी शस्त्रs अथवा दारूगोळा खरेदी करण्याचे विशेषाधिकार केंद्राने लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या उपप्रमुखांना दिले आहेत. दिवंगत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या अधिकारात सैन्याला आणीबाणीच्या काळात शस्त्रs अथवा दारूगोळा खरेदीसाठी असलेली आर्थिक तरतूद 100 कोटींवरून 500 कोटींवर नेली होती.

उरी हल्ल्याने हिंदुस्थान झाला सावध

18 सप्टेंबर 2016 ला पाकिस्तानच्या 4 सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-कश्मीरच्या उरीत सुरक्षा दलांवर भीषण जिहादी हल्ला केला होता. या हल्ल्यातील अडचणींमुळे अशा हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अतिरिक्त शस्त्रसाठा जवळ असायला हवा याची जाणीव हिंदुस्थानी लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाला झाली आहे. एक वेळेस तर सैन्याला युद्धासाठी 40 दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा बाळगण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू होता. पण काही अपरिहार्य परिस्थितीमुळे तो विचार पृतीत येऊ शकला नाही. त्यानंतर 10 दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा जवळ बाळगण्याची परवानगी हिंदुस्थानी सैन्याला देण्यात आली होती. पण आता चीन आणि पाकिस्तान एकाचवेळी सीमेवर फुरफुरू लागल्याने आणि उरी हल्ल्यावेळची परिस्थिती लक्षात घेता हिंदुस्थानी सैन्य आणि संरक्षण मंत्रालय सावध झाले आहे. त्यामुळेच सैन्याला 15 दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे.

तिन्ही सैन्यदलांना 300 कोटी रुपये खर्चाचा अधिकार

हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्यदलांना मिळून आपत्कालीन वापरासाठी 300 कोटी रुपये खर्चाचे अधिकार केंद्र सरकारने दिले आहेत. युद्धात आणीबाणीची स्थिती आल्यास सैन्य या आर्थिक अधिकारामुळे आवश्यक क्षेपणास्त्रे आणि मिसाईल यंत्रणेची खरेदी करू शकेल. तर भूदलाला युद्धासाठी तोफा आणि रणगाडय़ासाठीचा दारूगोळा आपत्कालीन स्थितीत खरेदी करण्याची मुभा नव्या निर्णयाने मिळणार आहे.