
जगात अनेक देश तेथील अजब नियम आणि कायद्यामुळे ओळखले जातात. उत्तर कोरियामध्ये पुरुषांना हुकूमशहा किम जोंग ऊन यांच्यासारखी हेअरस्टाईल ठेवणे आणि त्याचा फोटो घरात ठेवणे बंधनकारक आहे. उत्तर कोरियाचा मित्र चीनमध्येही काही प्रमाणात अजब-गजब नियम पाहायला मिळतात. सध्या हिंदुस्थानसोबत चीनचा सीमावाद सुरू असल्याने नागरिकांना चिनी गोष्टींबाबत तिरस्कार निर्माण झाला आहे. मात्र शत्रू देशाबाबत देखील काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. आज आपण चीनमधील अशाच 15 अजब गोष्टीबाबत जाणून घेणार आहोत.
1. चीनमध्ये श्रीमंत लोक गुन्हा केल्यास आपल्याऐवजी दुसऱ्याला तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी पाठवू शकतात. .
2. चीनची खरेदीक्षमता अमेरिकेपेक्षा जास्त आहे. अर्थात येथील लोकसंख्या जास्त असल्याने त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास प्राधान्य आहे. म्हणून या दृष्टीने चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरते.
3. अमेरिकेपेक्षा चीनमध्ये इंग्रजी बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे.
4. चीनमध्ये एक अशीही वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला गर्लफ्रेंड उधार मिळते. एका आठवड्याचा रेट हजारांमध्ये आहे.
5. जगभरात कोठेही तुम्हाला जायंट पांडा आढळल्यास डोळे बंद करून सांगा की यावर चीनचा अधिकार आहे. कारण चीनने ही प्रजाती लीजवर घेतली आहे. आणि यामुळे त्यांच्या पिल्लांवरही चीनचा अधिकार मानला जातो.
6. 2025 पर्यंत चीनमध्ये अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहराएवढे 10 शहर असतील.
7. चीनमध्ये पक्षांनी बनवलेल्या घरट्याच्या सूप ची मोठी मागणी असते. याला ‘इटेबल बर्ड नेस्ट’ सूप किंवा ‘स्विफ्टलेट’ म्हटले जाते. दीड लाख रुपये प्रति किलोने घरटे विकले जाते.
8. चीनमधील लोकांनी एक रांग बनवून तुमच्या समोरून जाण्याचे ठरवल्यास संपूर्ण आयुष्य अपुरे पडेल. कारण तिथे लोकसंख्या बेसुमार आहे.
9. चीनमध्ये अनेक गगनचुंबी इमारती मोकळ्या पडून आहेत, तरीही तिथे बांधकाम वेगाने सुरू असते. पुढील 20 वर्षात चीनमध्ये 20 स्मार्टसिटी उभ्या राहतील. मात्र यातील बहुतांश ‘घोस्ट सिटी’ असतील, आजही तिथे अशी शहर आहेत.
10. चीनमध्ये ब्रेन डेडची गंभीर समस्या आहे. दुसऱ्या देशात शिक्षणासाठी गेलेल्या 10 चिनी विद्यार्थ्यांपैकी 7 कधीच मायदेशी येत नाहीत.
11. हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट कधीही चीनला जाऊ शकत नाही. कारण त्याने ‘सेवन ईयर्स इन तिब्बत’ या सिनेमात काम केले आहे. यामुळे चीनने ब्रॅड पिट, डेविड थ्यूलिस आणि चित्रपटाचे दिग्दर्शक जी जॅक्स अनॉद यांच्यावर बंदी घातली आहे.
12. चीनमध्ये 2010 मध्ये तब्बल 10 दिवसांचा ट्राफिक जाम झाला होता. बीजिंगवरून मंगोलियाला जाणाऱ्या मार्गावर 60 मैलांपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.
13. चीनमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे येथे बॉडी फिशरची नोकरी आरामात मिळते. नदीत उडी मारून जीव दिलेल्या लोकांचा मृतदेह शोधण्याचे काम यांच्यावर असते.
14. चीनमध्ये दरवर्षी डॉग फेस्टिव्हल आयोजि केला जातो. येथे अत्यंत क्रूरपणे आणि वेदना देऊन कुत्र्यांना मारले जाते आणि त्यांचे मास भक्षण केले जाते.
15. चीनने जगाला ‘सार्क’, ‘कोरोना’ यासारख्या जीवघेण्या आजारांची देणगी दिली.




























































