चीनची मस्ती कायम, गलवानमध्ये 33 दिवसांत चीनने उभारले 16 कॅम्पस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाख सीमेवरील गलवान खोऱयातून एक किलोमीटर मागे हटलो, असा दावा चीनने केला असला तरी त्यांची मस्ती कायमच असल्याची सॅटेलाईट छायाचित्रे हिंदुस्थानी लष्कराला मिळाली आहेत. चीनने गलवान खोऱयात 33 दिवसांत तब्बल 16 लष्करी पॅम्प उभारले असून मोठय़ा प्रमाणावर सैन्याची जमवाजमव केल्याचेही या छायाचित्रावरून उघड झाले आहे.

लडाखमधील हिंदुस्थान-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील नऊ किलोमीटर हद्दीतील ही सॅटेलाईट छायाचित्रे असून हिंदुस्थानी लष्कराने गलवान नदीवर उभारलेली संरक्षक भिंतही चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उद्ध्वस्त केल्याचे दिसत आहे. ‘प्लॅनेट लॅब’च्या पॅमेऱयात पैद झालेल्या या छायाचित्रांत चीनचा खोडसाळपणा समोर आला आहे. काळय़ा रंगाच्या ताडपत्र्या घातलेले तंबू, शेकडो ट्रक्स, बुलडोझर्स यांची वर्दळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसते.

हिंदुस्थान-जपान नौदलाचा युद्धाभ्यास

ins

चीन हिंदुस्थानलाच नव्हे, तर जपानलाही नडतो आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान व जपानच्या नौदलाने हिंदी महासागरात संयुक्त सराव केला. जपानच्या मेरिटाइम सेल्फ डिफेन्स पर्ह्सच्या जेएस कशिमा आणि जेएस शिमायुकी यांनी हिंदुस्थानी नौदलाच्या आयएनएस राणा आणि आयएनएस पुलीसरा यांच्यासह सरावात सहभाग घेतला.