कपड्यांच्या आरपार दाखवणाऱ्या एक्स रे कॅमेरा फोनमुळे खळबळ, चिनी कंपनी वादात

3696

‘बादशहा’ चित्रपटात शाहरुख खानकडे कपड्याच्या आरपार पाहता येणारा चष्मा असल्याचे दाखवण्यात आले होते. असाच काहीसा कॅमेरा चीनची स्मार्टफोन कंपनी वन प्लसने आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये दिला होता. या कॅमेऱ्याच्या मदतीने कपड्याच्या आणि प्लास्टिक वस्तूच्या आरपार पाहता येत होते. मात्र यावर गदारोळ झाल्यानंतर कंपनीने यावर बंदी घातली आहे. मात्र स्मार्टफोनमध्ये एक्स रे व्हर्जन कॅमेरा सेन्सर का देण्यात आला याबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही.

चायनीज कंपनी वन प्लसच्या OnePlus 8 Pro मध्ये हा कॅमेरा देण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या कॅमेरासोबत इन्फ्रारेड फोटोक्रोम लेंस देण्यात आली होती आणि याद्वारे काही विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिक व कपड्याच्या आरपार पाहता येत होते. युजर्सच्या प्रायव्हसीचा मुद्दा उठू लागल्याने कंपनीने यावर तात्काळ बंदी घातली आणि सेन्सरला डिसेबल करण्यात आले.

screenshot_2020-07-10-15-34-49-924_com-android-chrome

कंपनीच्या प्रवक्त्याने ‘द सन’सोबत बोलताना सांगितले की, नवीन अपडेटमध्ये कॅमेरा डिसेबल करण्यात आला असून युजर्स फोटोक्रोम लेन्सच्या मदतीने फोटो काढू शकतील. कंपनीने सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्याने प्लास्टील वस्तू किंवा कपड्याच्या आरपार दिसणे बंद झाले आहे. बुधवारी हा बदल करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या