चिनी कंपनी टीकटॉकचा अमेरिकेतील टाइम संपत आला

हिंदुस्थानात बंदी घालण्यात आलेल्या टीकटॉकचा अमेरिकेतील टाइमही आता संपत आला आहे. अमेरिकन काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटव्हने नुकतेच एक विधेयक मंजूर केले आहे. चिनी नागरिकांच्या मालकीचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकने अमेरिकेतील उत्पादने विकली नाहीत तर त्यावर अमेरिकेत बंदी घालण्यात येईल अशी तरतूद विधेयकात आहे.

या विधेयकात सहा महिन्यात भागभांडवल विकण्याची मुदत देण्यात आली आहे. हे विधेयक डेमोव्रॅट आणि रिपब्लिकन पक्षांच्या प्रचंड पाठिंब्याने सभागृहात मंजूर करणयात आले. अमेरिकेतील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही टीकटॉकचे मालक असलेली चिनी तंत्रज्ञान पंपनी बाइट्स लिमिटेडच्या संबंधात राष्ट्रीय सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली होती. सुधारित तरतुदी असलेले विधेयक वरच्या सभागृहात म्हणजेच सिनेटकडे मंजुरी पाठवले जाणार आहे. कायदा केला असला तरीही पंपनीला खरेदीदार शोधण्यासाठी साधारण वर्षभराचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, अमेरिकेत टीकटॉकचे तब्बल 17 कोटी युजर्स आहेत.

असे आहे टीकटॉक

टीकटॉक सोशल मीडिया ऑप्लिकेशन आहे. या अॅपद्वारे स्मार्टपह्न युजर्स 15 सेपंदांपर्यंतचे छोटे व्हिडीओज तयार आणि शेअर करू शकतात. 2016 मध्ये चीनने टीकटॉक लॉँच केले. 2018 मध्ये टीकटॉकची लोकप्रियता झपाटयाने वाढली आणि ऑक्टोबर 2018 मध्ये ते अमेरिकेत सर्वाधिक डाऊनलोड केलेले अॅप बनले.