
चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू, हे दोन आठवड्यांहून अधिक काळापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ली शांगफू हे गेल्या बऱ्याच काळापासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. आता त्यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती अमेरिकन सरकारकडून देण्यात आली आहे.
चीनच्या भोवती नेहमीच संशयाचं वातावरण पाहायला मिळतं. महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या अनेक घटना याआधीही समोर आल्या आहेत. अर्थात चीनकडून त्यावर बोलण्याचं टाळलं जातं. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, शांगफू यांच्याकडून गुपचूपपणे संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त फायनान्शियल टाईम्सनं वृत्त दिलं आहे.
ट्विटरवरून जपानमधील अमेरिकेचे राजदूत रहम इमॅन्युएल यांनी लिहिलं, ‘अध्यक्ष शी यांची कॅबिनेट लाइनअप आता अगाथा क्रिस्टीच्या ‘अँड देन देअर अर नन’ या कादंबरीसारखी आहे’.
‘आधी परराष्ट्र मंत्री किन गँग बेपत्ता झाले, नंतर रॉकेट फोर्स कमांडर बेपत्ता झाले आणि आता संरक्षण मंत्री ली शांगफू दोन आठवड्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत’, असं त्यांनी लिहिलं आहे.
त्यानं पुढे हॅम्लेटमधील शेक्सपियरचा उल्लेख केला आणि लिहिले, ‘डेन्मार्क राज्यात काहीतरी सडलेले आहे’. पहिले: संरक्षण मंत्री ली शांगफू यांना 3 आठवड्यांपासून पाहिले किंवा ऐकले नाही. दुसरे: ते व्हिएतनामच्या व्हिझिटवेळी दिसले नाहीत. आता: सिंगापूरच्या नौदलाच्या प्रमुखांसोबतच्या नियोजित बैठकीला ते अनुपस्थित आहेत. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं?… तिथे गर्दी होत असावी. चांगली बातमी अशी आहे की त्याने कंट्री गार्डन रिअल इस्टेट डेव्हलपर्सकडे गहाण ठेवल्याचे मी ऐकले आहे’.
जुलैमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग बेपत्ता झाल्यानंतर शांगफू बेपत्ता झाले होते.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्स, देशाच्या पारंपारिक आणि आण्विक क्षेपणास्त्रांवर देखरेख करणार्या एलिट फोर्समधून दोन सर्वोच्च जनरल्सना काढून टाकलं.
वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, व्हिएतनामी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं की, ‘शारीरिक व्याधीं’मुळे ली यांनी गेल्या आठवड्यात अचानक एक बैठक रद्द केली.