वक्रतुंडाचे थेट आकाशातून आगमन, चिपी विमानतळावरीव लँडींग यशस्वी

सामना ऑनलाईन, सिंधुदुर्ग

गेल्या अनेक महिन्यांपासून कोकणवासीयांना ज्या आगमनाची उत्सुकता होती त्या गजाननाचे थेट आकाशातून आगमन झाले आहे. गणपती बाप्पा घराघरात विराजमान होण्याच्या एक दिवस आधी चिपी विमानतळावरील चाचणी लँडींग यशस्वी झाले आहे.

या विमानातून गणपती बाप्पाची मुर्ती आणण्यात आली आहे. विघ्नहर्त्याच्या कृपेमुळे हे लँडींग यशस्वी झाले असून डिसेंबरपासून हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी अपेक्षा आहे. विमानातून आलेल्या गणपती बाप्पाची विमानतळावर प्रतिष्ठापना होणार आहे. इथला गणपती दीड दिवसांचा असेल असं सांगण्यात आलं आहे.  पुढच्या गणेशोत्सवात रस्ते आणि रेल्वे प्रवासाव्यतिरिक्त कोकणात जाण्यासाठी हवाई मार्गाचाही पर्याय उपलब्ध असणार आहे.