Photo – चिपळूणात एनडीआरएफचे मदतकार्य सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापूराने वेढलेल्या चिपळूण शहरात एनडीआरएफ,स्थानिक मच्छिमार,आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी मदत कार्य सुरू केले आहे. सध्या चिपळूणमध्ये 15 बोटी उपलब्ध असून त्यापैकी 8 बोटी मार्फत बचाव कार्य सुरु आहे.

chiplun-rescue-jpg2

चिपळूण येथे मोबाईल नेटवर्क नसल्याने फोन लागत नाहीत त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासन पोलीस वायरलेस मार्फतच संदेशवहन करत आहे. चिपळूण तालुक्यात अतिवृष्टीमुळ्ये संकटात सापडलेल्या नागरिकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता भासत आहे.

chiplun-rescue-jpg1

अशा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींनी शासकीय यंत्रणेबरोबर संपर्क करण्यासाठी https://forms.gle/q465Ws1borgnzVdQA या गुगल लिंकवर मदतीसाठी अर्ज भरुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी केले आहे.

chiplun-rescue