चोपड्यात अंगावर वीज पडल्याने नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू

अंगावर वीज पडल्याने चोपडा नगर पालिकेच्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी चोपडा शहरातील रामपूरा भागातील नगरपालिकेच्या गांडूळ प्रकल्पाजवळ घडली.

रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट होऊन पावसाच्या सरी कोसळून लागल्या. याच दरम्यान अचानक अंगावर वीज पडल्याने दीपक भागवत पारधी (वय- 29) याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रामपूरा भागातील गांडूळ प्रकल्पा जवळ घडली.

नगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून दीपक पारधी कामावर होता. घटनेनंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.तृप्ती पाटील यांच्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या