हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा; मिशेलच्या भागीदाराला समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातील मध्यस्थ आणि ब्रिटिश नागरिक ख्रिस्तियन मिशेल याचा बिझनेस पार्टनर डेव्हिड निगेल जॉन सिम्स याला दिल्ली न्यायालयाने नव्याने समन्स बजावले. सदर खटल्यात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात सिम्स याला आरोपी केले आहे. विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी सिम्स याला कोर्टात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले. सीबीआयने सिम्स आणि त्याच्या मालकीच्या ग्लोबल सर्व्हिसेस एफझेडई आणि ग्लोबल ट्रेडर्स या कंपन्यांवर आरोपपत्र ठेवले आहे. हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात मध्यस्थ ख्रिस्तियन मिशेल याच्यासह गुइडो हॅशके आणि कार्ल गेरोसा या तिघा मध्यस्थांवर सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केली आहे.