रोनोल्डोचा 750वा गोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू खिस्टियानो रोनाल्डोने कारकिर्दीतील 750 वा गोल केला. तो खेळत असलेल्या इटलीतील जुवेंतस क्लबने चॅम्पियन लीगमध्ये डायनामो कीव क्लबचा 3-0 गोल फरकाने धुक्वा उडविला. फेडेरिको चिएसाने पहिल्या हाफमध्ये गोल करून जुवेंतस क्लबचे खाते उघडले. त्यानंतर रोनाल्डोने दुसरा, तर मोराटाने तिसरा गोल केला. रोनाल्डोने सामन्यानंतर सोशल मिडियावर ‘750 गोल, 750 आनंदाचे क्षण, चाहत्यांच्या चेहऱयावरील 750 हास्य. सर्व सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली, त्यांचे धन्यवाद, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.